नोकरीसाठी १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी आहे. ही भरती कंत्राटी पदासाठी केली जाणार आहे. ६८ पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ६ हजार ते १०,००० रुपये मासिक वेतन मिळणार आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला वेतन मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ विभाग, विभागीय कार्यालयात तुम्हाला नोकरीसाठी यावे लागणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.