कृषी पंप धारकांसाठी आनंदाची बातमी.! शेतकऱ्यांना दिली सरकारने ही मोठी खुशखबर

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना सुरू केली असून, या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कृषी पंपधारक शेतकरी ग्राहकांचे तब्बल ४६ कोटी रुपयांचे वीजबिल माफ केले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजनेनंतर या सरकार करणार महिलांच्या खातात दहा हजार रुपये जमा

शेतीला शाश्वत पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने अनेक शेतकरी कृषिपंपाचा वापर करतात.या कृषिपंपांना महावितरणच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे शेती उत्पादनामध्ये कृषिपंपांचा महत्त्वाचा वाटा आहे.शेतकऱ्यांना लाभ मिळावा, या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलती योजना जाहीर केली आहे. २५ जुलै २०२४ रोजी यासंदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला आहे.त्यानुसार ७.५ अश्वशक्तीपर्यंत शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा करण्याचे धोरण शासनाने राबविले आहे. ही योजना पाच वर्षांसाठी म्हणजे मार्च २०२९ पर्यंत राबविण्यास मान्यता दिली आहे.त्यामुळे या योजनेअंतर्गत एप्रिल ते जून या तीन महिन्यांमध्ये हिंगोली जिल्हयातील ७.५ एचपीच्या कृषि पंप ग्राहकांचे ४६ कोटी रुपये माफ करण्यात येणार आहेत, अशी माहिती महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिली.शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहेच. मात्र अनेक भागात दिवसा वीजपुरवठा खंडित असतो. तो सुरु ठेवावा अशी मागणी होत आहे.

Leave a Comment