मोफत गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी आजच करा ही दोन कामे

नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेपाठोपाठ आता मोफत गॅस देणारी अन्नपूर्णा योजना सरकारने आणली आहे. पूर्वीच्या उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत वर्षातून तीनवेळा मोफत गॅस सिलिंडर दिले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजने नंतर या महिलांच्या खात्यात सरकार करणार 10 हजार रुपये जमा 

उर्वरित महिलांनी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात उज्ज्वला योजनेंतर्गत १ लाख ७० हजार ११० महिलांना मोफत गॅसकनेक्शन देण्यात आले होते. राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणली आहे.या योजनेच्या लाभार्थींनी गॅसची मागणी केल्यानंतर संबंधित एजन्सीकडून मोफत गॅसपुरवठा केला जात आहे. त्यानंतर राज्य शासनाकडून संबंधित कंपनीला त्याचे पैसे दिले जाणार आहेत. या योजनेंतर्गत १५ ऑगस्टपर्यंत ३५ हजार ७४८ लाभार्थींनी लाभ घेतला. २ ऑगस्टपर्यंत ५४ हजार ५७४ महिलांनी गॅस भरून घेतले आहेत. दरम्यान, उज्ज्वला योजनेला लाभ घेण्यासाठी लाभार्थींना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.अनेकांना अद्याप ई-केवायसी केली नसल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही.

Leave a Comment