लाडक्या बहिण योजनेचे तीन हजार रुपये मिळाले नाही लवकर करा हे काम खात्यात होणार पैसे जमा

नमस्कार मित्रांनो स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येपासून अर्ज दाखल केलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 64 लाख 40 हजारपेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. यातील जवळपास 1 कोटी 36 लाख पात्र महिला आहेत. अजूनही नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. यासाठी पात्र महिलेच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे.या योजनेअंतर्गत अधिकाधिक माता-भगिनींपर्यंत सन्माननिधी वितरित करण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे,” असे आदिती तटकरे यांनी सांगितले.

 

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणी योजनेचे तीन हजार रुपये कोणत्या खात्यात मिळणार इथे क्लिक करून बघा

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केला आहे. यातील 1 कोटी 36 लाख महिला पात्र ठरल्या आहेत. मात्र अर्ज दाखल करताना संबंधित महिला अर्जदाराचे बँक खाते आधारशी संलग्न नसेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच बँक खात्यात पैसे येण्यासाठी आधार नंबर आणि बँक खाते एकमेकांशी लिंक असणे गरजेचे आहे. तसे नसल्यास महिलांना लाभ मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर महिलांनी आपले ‘बँक सिडिंग’ स्टेटस चेक करावे. आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसतील तर ते लवकरात लवकर करून घ्यावे. त्यानंतरच तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील. बँक सिडिंग स्टेटस पाहण्यासाठी तुम्हालाhttps://uidai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

Leave a Comment