लाडकी बहीण योजनेबाबत शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय लाखो महिलांना होणार आता हा फायदा

नमस्कार मित्रांनो सध्या राज्यभरात चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिना  1500 रुपये दिले जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात झाले जमा इथे बघा तुमच्या खात्यात झाले का पैसे जमा

 

या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठी 3000 रुपये आले आहेत. दरम्यान, या योजनेसाठी महिलांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे

हे सुध्दा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात झाले जमा इथे बघा तुमच्या खात्यात झाले का जमा

 

राज्य सरकारकडून महिलांनी केलेल्या अर्जांची युद्धपातळीवर तपासणी केली जात आहे. महिलांच्या अर्जांची छननी करून संबंधित महिला पात्र आहे की नाही, हे ठरवले जात आहे. 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यात सरकारने 3000 रुपये टाकले आहेत. अजूनही 17 ऑगस्टपर्यंत महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळणार आहे.राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने आतापर्यंत 80 लाख महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी वितरित केला आहे. 14 ऑगस्टच्या रात्री साधारण 32 लाख पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ देण्यात आला. तर स्वातंत्र्यदिनी पहाटे 4 वाजता 48 लाख महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले.

Leave a Comment