महिलांसाठी आनंदाची बातमी.! लाडकी बहीण योजनेची दुसरी यादी होणार जाहीर इथे तपासा लवकर यादीत आपले नाव

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने माता-भगिनींसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. महिलांना आर्थिक आधार मिळावा म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात होणार चार हजार रुपये जमा

कोरेगाव मतदारसंघात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व माता- भगिनींना मिळावा, या योजनेपासून पात्र एकही महिला वंचीत राहू नये यासंदर्भाने कोरेगाव तहसीलदार कार्यालयात या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने नियुक्त केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण विधानसभा क्षेत्रीय समितीची महत्वपूर्ण बैठक ना. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत सादर करण्यात आलेल्या आणि छाननीमध्ये पात्र ठरलेल्या ११ हजार ५२० महिलांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

कोणत्याही परिस्थितीत एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, राज्य सरकारने या योजनेसाठी ठेवलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केले जाणार असल्याचा शब्द ना. शिंदे यांनी दिला.

Leave a Comment