शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये या दिवशी होणार खात्यात जमा

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केली

 

. या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये जमा केले जातात. राज्य सरकारने २०२३-२४ मध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. आता नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्य सरकारने चौथ्या हप्त्यासाठी 2041 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

इथे क्लिक करून बघा केव्हा होणार खात्यात दोन हजार रुपये जमा

राज्य सरकारनं नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी आतापर्यंत 5512 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते जुलै या ती महिन्यांच्या कालावधीसाठी 1720 कोटी रुपये खर्च केले होते. त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीसाठी 1792 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. डिसेंबर ते मार्च या कालावधीसाठी 2 हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. आता या योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी 2041 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून प्रशासकीय खर्चासाठी 20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

इथे क्लिक करून बघा केव्हा होणार खात्यात दोन हजार रुपये जमा

Leave a Comment