मोदी सरकारचा मोठा निर्णय.! या शेतकऱ्यांना मोदी सरकार देणार हा फायदा

नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली (ता.२८) केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वपुर्ण बैठक पार पडली.

हे सुद्धा वाचा लाडकी बहिण योजनेचे 3000 हजार रुपये या तारखेला खात्यात होणार जमा

या बैठकीत आज अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी देखील एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सरकारने आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

कृषी पायाभूत सुविधा निधीत 1 लाख कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे. या अंतर्गत सरकार पीक काढणीनंतरच्या कामावर भर देणार आहे.ॲग्री इन्फ्रा फंडाच्या पैशातून एकात्मिक पॅक हाऊस बांधले जाणार आहे. शेतमाल ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज विकसित केले जाणार आहे.शेतमालाच्या वाहतुकीसाठी रेफ्रिजरेटेड वाहने उपलब्ध केली जाणार आहे. शेतमालावर प्रक्रिया करणारे युनिट स्थापन केले जाणार आहे.- विशेष म्हणजे पीएम कुसम योजनेंतर्गत सोलर प्लांटमधून या ग्रीडला वीज विक्री करता येणार आहे. असेही सरकारने म्हटले आहे. अशा परिस्थितीत प्लांट उभारण्यासाठी ॲग्री इन्फ्रा फंडातून निधी उपलब्ध होणार आहे.या योजनेच्या माध्यमातून फळे उत्पादक शेतकरी काढणीनंतर साठवणुकीसाठी प्रक्रिया करण्यासाठी आणि रस तयार करण्यासाठी प्लांट उभारू शकणार आहे. या प्रकल्पासाठी नाबार्डकडून निधीची व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Comment