शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.! या तारखेपासून राज्यात पडणार जोरदार पुन्हा मुसळधार पाऊस

नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकरी राजा साठी आनंदाची बातमी आहे. 18 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट असे सात दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार असून आठवडाभर वरुण राजाने हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा:- या योजनेअंतर्गत होणार तुमच्या खात्यात नऊ हजार रुपये जमा आजच करा अर्ज

या काळात मुंबईतही पाऊस पडेल. याशिवाय विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यांत पाऊस पडेल. मराठवाड्यात हिंगोली, नांदेड, लातूर, बीड परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यांत पाऊस पडेल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार आणि धुळे येथे पाऊस पडेल, तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस पडू शकतो, असेही दख यांनी सांगितले. काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. काही ठिकाणी कडक उन्हाचेही चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस गायब होता, मात्र गेल्या २४ तासांत अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. आजही मुंबई, ठाण्यासह राज्यात पावसाची शक्यता आहे. याशिवाय मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा पिवळा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Comment