एसटी बस प्रवासांसाठी खुशखबर.! आता खिशात पैसे नसणार तरीही करता येणार एसटीमध्ये प्रवास

नमस्कार मित्रांनो राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकीटासाठी पैसे खर्च करण्याची चिंता करावी लागणार नाही.

 

त्यासाठी महामंडळाने ‘यूपीआय’ प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ETIM (Android तिकीट जारी करणारी मशीन) सर्व वाहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी प्रवासादरम्यान रोख रकमेऐवजी UPI, QR कोड यासारख्या डिजिटल पेमेंटचा वापर करून तिकीट खरेदी करू शकतात.

हे सुद्धा वाचा तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर मिळणार पाच लाख रुपये इथे करा अर्ज

कॅशलेस व्यवहारांच्या बाबतीत, एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकले असून प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमध्ये तिकीट खरेदी करण्यासाठी फोन पे, गुगल पे यांसारखी UPI पेमेंट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वाहकांकडून ETIM वर ‘QR कोड’ द्वारे, प्रवासी डिजिटल स्वरूपात तिकिटांसाठी पैसे देऊ शकतात. अर्थात, या सुविधेमुळे प्रवाशांच्या खिशात रोकड उरली नाही आणि अतिरिक्त बदलावरून वाहकांसोबतचे वाद कायमचे मिटले. प्रवाशांनी या सोप्या आणि सोयीस्कर तिकीट प्रणालीला चांगला प्रतिसाद दिला आहे, जानेवारीमध्ये केवळ UPI द्वारे दररोज 3500 तिकिटे जारी करण्यात आली होती. मे महिन्यापर्यंत दररोज सरासरी 20,400 तिकिटे जारी केली जात असून, त्यात पाचपट वाढ झाली आहे.

इथे क्लिक करून बघा खिशात रक्कम नसताना तरी करता येणार प्रवास

Leave a Comment